देव म्हणजे काय ग ,व्याख्या तरी सांग ,
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग ,
.
.
देवळात आलो नाही म्हणून उगीच आपली रुसतेस ,
पण रुसलीस कि आभाळातल भिरभिर पाखरू दिसतेस ,
इतक मोठं आभाळ तुला कुणी दिलं सांग !
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग !
.
.
अशी कशी तू आज मला 'नास्तिक ' म्हणू शकलीस ?
नास्तिकाला देवच नसतो हे कुठे शिकलीस ?
अगं तुमचा देव माझ्यासाठी देवळाबाहेर येतो ,
तुझ्यावरच्या कवितेसाठी शब्द देवून जातो ,
तू तिथे रिकाम्या गाभार्यात असतेस उभी ,
तुझी होते फसगत ,तुला कळतंच नाही कधी ,
गाभारयात त्याला परत धाडून मी फेडतो तुझे पांग ,
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
.
देवळाबाहेर उभा असतो चपला तुझ्या दिसतात ,
माझ्यापेक्षा काट्यानपासून त्याच तुला जपतात ,
तरी त्यांना तुझ्यासोबत देवळात थारा नाही ,
कधी कधी मग खरच वाटतं ,मलाही किंमत नाही !
इतकं झिजून का ग त्यांची देवळाबाहेर रांग ?
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग ,
.
.
देव म्हणजे काय ग व्याख्या तरी सांग !
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
.
;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;august 09
मस्तच ...आवडली ...
ReplyDelete"देवळाबाहेर उभा असतो चपला तुझ्या दिसतात ,
माझ्यापेक्षा काट्यानपासून त्याच तुला जपतात ,
तरी त्यांना तुझ्यासोबत देवळात थारा नाही ,
कधी कधी मग खरच वाटतं ,मलाही किंमत नाही !
इतका झिजून का ग त्यांची देवळाबाहेर रांग ?
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग ,"
वाह ....
vah, farach chhan!!!!!
ReplyDeleteछान......... सुंदर
ReplyDeleteदेव म्हणजे काय ग व्याख्या तरी सांग