Tuesday, July 5, 2011

;;;;;;;;;;;;;छळतील माणसे हि ;;;;;;;;;;;;;;;

 
 
न कुणा कळलीत न कळतील माणसे हि ,
अन अशीच वागुनी छळतील माणसे हि !
 
पाऊले दमतील अन रमतील जेव्हा 'हे' कुठे ,
वेग मी घेता जरा, जळतील माणसे हि !
 
'राम' चे गुणगान अन हनुमान यांचा सारथी,
सोडूनी पहा खुले ,चळतील  माणसे हि !
 
कोण जाईल यांसावे ती कासवे जिंकायला !
टाकुनी कधीही मला पळतील माणसे हि !
 
टाकुनी विश्वास हा निश्वास रे सोडू नका,
न कुणा फळलीत न फळतील माणसे हि !
 
 
;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;
 

Sunday, July 3, 2011

;;;;;;;;;;;;;;आता येईल साजण;;;;;;;;;;;;आता येईल साजण
चंद्र प्रीतीचा घेउनी
संगे त्याच्या दूर देशी
तुला जाईल घेउनी .

.
अशी हिरमुसू नको
नको वेडावून जाऊ
सांज रेंगाळेल थोड़ी
नको उतावीळ होऊ .

.
अशी रागावू नकोस
वेळ झाला जरी फार
तुझ्यासाठीच साजन
झाला वाऱ्यावर स्वार

.
दिसभरचा थकवा
तुझा जाईल विरून ,
जेव्हा साजन घेईल
तुला मिठीत भरून .

.
;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;
.
आता येईल साजण चंद्र प्रीतीचा घेउनी या ओळी आधी कुठेतरी ऐकल्या होत्या ,
त्यावरून हे पुढचं सुचलंय .
ज्यांच्या या ओळी आहेत आहेत त्यांचे आभार ....!

Monday, May 9, 2011

;;;;;;;;;;;;;;;; चालली कोण हि सुंदर नार ;;;;;;;;;;;;;;;;;;


लटके लटके चाल चालुनी जीव आता घेणार ,
कसे कळावे नाव हिचे परी क्षणात हि जाणार ,
नयन कट्यारी आधीच त्यावर कातील काजळधार ,
वळूनही पाहत नाही  झाले कुणा कुणावर वार .
.
हिच्या  नयन पाशात गुंतण्या  मीन जाहले सारे ,
कुठे जराशी झलक  पाहण्या  फिरती  होऊन वारे , 
खळी गालची भासे कोणा जगण्याला  आधार,
वीर जगाचे असोत  कोणी इथेच होती ठार ... 
.
अशी सुंदरा जाता जाता पायाशी अडखळली ,
तिला धराया भोवतालची मुले पुढे सरपटली ,
कोण्या हाती कशी पडावी चपळ असे हि खार , 
सावरून मग स्वत स्वताला क्षणात होई पसार  .
.
ती गेली पण विरतच नाही हृदयावरची प्रतिमा,
त्या कर्त्याच्या कल्पनेस मग द्यावी वाटे उपमा,
घेई मग ती अनामिका मम कवितेचा आकार ,
कुणा ना ठावे  कुठे चालली कोण हि सुंदर नार .
.
  
चालली कोण हि सुंदर नार ......!
.
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

Monday, April 18, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;;;;; सूर्यास ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

अग्निगोल हा जळी बुडाला विझेल बघ निमिषात ,
सागरातुनी सूर्य चालला रात्रीच्या उदरात .


........... सांगा कोणी या योग्याला आग तुझ्या अंतरी ,
........... चंद्रकोर बघुनी भिजलेली वितळी लोण्यापरी .


घुटमळूनी हा असा केशरा वाट पाहशील किती ,
आज चंद्रमा नभात नाही अमावसेची तिथी .


........... समदुखी रे आपण , उरले आठवणींचे भास ,
........... मला प्रिया अन तुला चंद्रमा दर्शन नाही आज.;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

Monday, March 7, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;; तु ;;;;;;;;;;;;;;;;;;

बघता तुला असा मी , लाजून चूर होते ,
येता जरा समीप  झटकून दूर होते .
.
हि कोणत्या कळीची तू ओढलीस लाली
हळुवार स्पर्श  होता उमलून फुल होते .
.
मग  लाभते नव्याने हि ओढ  जीवघेणी ,
जेव्हा तुझी बटा ती गाली फितूर होते .
.
होती तुझी अदा ती, कि कोणता तराणा ,
जणू धुंदल्या  वीणेचे अदृश्य सूर होते .
.
;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

Sunday, February 27, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; प्रश्न ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

तुझा तेवढा एकच प्रश्न आठवतोय आता ,
'कुठला एवढा विचार करतोस असा येता जाता ? '
.
'माझ्यासोबत असतानाही तुझ्यातच असतोस , 
मी काही बोलले कि तेवढ्यापुरता हसतोस ,
अचानकच थांबतोस छान गाता गाता ,
कुठला एवढा विचार करतोस असा येता जाता ? '
.
तुझा असला प्रश्न सारया आभाळभर दाटलेला   ,
उत्तराचा भार माझ्या काळजावर साचलेला .
.
खरं सांगू , हे कोड मलाच सुटत  नाही
मनात गणित चालूच राहतं  उत्तर मिळत नाही
काळ अलगद निघून जातो तुझ्यासोबत माझा  
मनात मात्र वाढत जातो शब्दांचा बोझा
मागे ठेवून प्रश्न सारे उठून निघून जातेस
बघता बघता सहजपणे गर्दीत विरून जातेस .

लक्षात येतं बोललो  नाही काहीच जाता जाता
तुझा तेवढा एकच प्रश्न आठवतोय आता  .....!

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; 

Thursday, February 3, 2011

;;;;;;;;;;;;;;; कुठून कविता देऊ ? ;;;;;;;;;;;;;;;;

सौंदर्याचा माज म्हणू कि म्हणू हिची शिरजोरी ,
आता कविता भाळत नाही मम चातुर्यावारी .


गंज चढे या बुद्धीला कि हृदय निकामे झाले ,
कसे चार शब्दांना माझे पान पोरके झाले ?


पाठ फिरविली शब्दांनी तरी मन त्यामागून फिरते ,
कुशीत माझ्या वही कवितेची अश्रू ढाळीत शिरते...!


प्रसन्न होईल कशी देवता कसे तिला समजावू ,
कोरी पाने रुसतील, त्यांना कुठून कविता देऊ ..?


;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

Wednesday, January 19, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; नास्तिक ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

तुझं अस्तित्व नाकारताना....
खरंतर,
मला सिद्ध करायचं असतं ,
माझ्यातल्या
नास्तिकत्वाच अस्तित्व .
.
.
.
पण तरीही माझ्यासाठी नसलेल्या ........
तुझे आभार ,
तुझ्यामुळेच नास्तिक या शब्दाला अर्थ आहे .......!


;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;