Tuesday, September 28, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; नास्तिक ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

देव म्हणजे काय ग ,व्याख्या तरी सांग ,
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग ,
.
देवळात आलो नाही म्हणून उगीच आपली रुसतेस ,
पण रुसलीस कि आभाळातल  भिरभिर पाखरू दिसतेस ,
इतक मोठं  आभाळ तुला कुणी दिलं सांग !
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग !
.
अशी कशी तू आज मला 'नास्तिक ' म्हणू शकलीस ?
नास्तिकाला देवच नसतो हे कुठे शिकलीस ?
अगं तुमचा देव माझ्यासाठी देवळाबाहेर येतो ,
तुझ्यावरच्या कवितेसाठी शब्द देवून जातो ,
तू तिथे रिकाम्या  गाभार्यात असतेस उभी ,
तुझी होते फसगत ,तुला कळतंच नाही कधी ,
गाभारयात त्याला परत धाडून मी फेडतो तुझे पांग ,
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
देवळाबाहेर उभा असतो चपला तुझ्या दिसतात ,
माझ्यापेक्षा काट्यानपासून  त्याच तुला जपतात ,
तरी त्यांना तुझ्यासोबत देवळात थारा नाही ,
कधी कधी मग खरच वाटतं ,मलाही किंमत नाही !
इतकं झिजून का ग त्यांची देवळाबाहेर रांग ?
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग ,
.
देव म्हणजे काय ग व्याख्या तरी सांग !
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;august 09

3 comments:

  1. मस्तच ...आवडली ...
    "देवळाबाहेर उभा असतो चपला तुझ्या दिसतात ,
    माझ्यापेक्षा काट्यानपासून त्याच तुला जपतात ,
    तरी त्यांना तुझ्यासोबत देवळात थारा नाही ,
    कधी कधी मग खरच वाटतं ,मलाही किंमत नाही !
    इतका झिजून का ग त्यांची देवळाबाहेर रांग ?
    पाप काय पुण्य काय फरक तरी सांग ,"

    वाह ....

    ReplyDelete
  2. छान......... सुंदर
    देव म्हणजे काय ग व्याख्या तरी सांग

    ReplyDelete