Monday, May 9, 2011

;;;;;;;;;;;;;;;; चालली कोण हि सुंदर नार ;;;;;;;;;;;;;;;;;;


लटके लटके चाल चालुनी जीव आता घेणार ,
कसे कळावे नाव हिचे परी क्षणात हि जाणार ,
नयन कट्यारी आधीच त्यावर कातील काजळधार ,
वळूनही पाहत नाही  झाले कुणा कुणावर वार .
.
हिच्या  नयन पाशात गुंतण्या  मीन जाहले सारे ,
कुठे जराशी झलक  पाहण्या  फिरती  होऊन वारे , 
खळी गालची भासे कोणा जगण्याला  आधार,
वीर जगाचे असोत  कोणी इथेच होती ठार ... 
.
अशी सुंदरा जाता जाता पायाशी अडखळली ,
तिला धराया भोवतालची मुले पुढे सरपटली ,
कोण्या हाती कशी पडावी चपळ असे हि खार , 
सावरून मग स्वत स्वताला क्षणात होई पसार  .
.
ती गेली पण विरतच नाही हृदयावरची प्रतिमा,
त्या कर्त्याच्या कल्पनेस मग द्यावी वाटे उपमा,
घेई मग ती अनामिका मम कवितेचा आकार ,
कुणा ना ठावे  कुठे चालली कोण हि सुंदर नार .
.
  
चालली कोण हि सुंदर नार ......!
.
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;