Monday, January 30, 2012

;;;;;;;;;;;;;; कशी सुचावी सुंदर कविता ;;;;;;;;;;;;;;;;
अश्या एकट्या कातरवेळी नको नको ते उधाण येते ,
मनात माझ्या प्रसुतवेदना, तरी कवितेचे मुल न होते ,

कल्पनेतले अश्व दौडती, शब्द घेउनी डोंगर रचती , 
दौड तयांची कुठवर चाले? शब्द हे माझे जागा भुलती. 

कशी सुचावी सुंदर कविता, रित्या मनातील रिता खजिना,
शब्द सांगतील घाव मनीचे, कुठवर सांगू हाच बहाणा.

कुणास हसवील, कुणास ठेवील मुके,न्याहाळीत शब्द जरी
त्या कवितेची वाट पाहतो, इथे थांबतो अधांतरी ...!;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;