पाणवठ्यावर आली गवळण
नाही किशन मुरारी ,
आज हरी ना छेडाया मज
नाही किशन मुरारी ,
आज हरी ना छेडाया मज
जाऊ कशी माघारी ........!
.
.
........................कशास रुसला कान्हा मजवर
........................घडला काहि गुन्हा ?
........................नको छळू रे नंदकिशोरा ,
........................दर्शन दे रे पुन्हा ,
.
भरून घागर निघते बाई ,
काविल मजवर माय ,
श्रीमुख पाहेविना परंतु
निघू न पाही पाय......!
.
.
........................आज कसा ना कान्हा माझी
........................भरली घागर फोडी ,
........................कुणास ठावे असेल हि पण ,
........................श्रीरं गाची खोडी ....!
.
करुण अवस्था करून माझी ,
दडून गम्मत पाही ,
आज उमगले तुझ्याविना
शृंगारा किंमत नाही ..............!
;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;
kya baat hai....chhan
ReplyDeleteछान......... सुंदर
ReplyDelete