Monday, October 18, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; पाऊस ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

रिते आभाळ घागर 
करू  पाहतो पाऊस ,
ये ना भीज माझ्यासवे 
नको एकटी जाऊस.
.
............... सांजवेळ तुझी माझी 
............... भिजू देत पावसात  
............... आता तुझे माझे गीत 
............... पोचू देत आभाळात 
.
साऱ्या साऱ्या भिजवावे 
हीच पावसाची रीत 
क्षणभर तो हि थांबे
तुझे ऐकण्यास गीत 
.
............... देहभान विसरून 
............... दे गं पावसाला गाणे 
............... वेडा विसरून आला 
............... त्याचे ढगात रहाणे  
.
का गं बिचाऱ्या छळशी 
त्याला आवरेना रडू 
ओल्या ओल्या पावसाला 
नको सुका सुका धाडू 
.
............... सखे जाऊ नको अशी 
............... बघ आभाळ सुकेल 
............... ' तू ' हि नाही ' तो' हि नाही 
............... कशी कविता सुचेल ?

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

3 comments:

  1. वाह रे अतुल! त्या टायटल ची तहान पण भागाव की (नुसत् 'पाउस' काय)

    ReplyDelete
  2. मस्त... पावसाचे गाणे ... अन आर्जव सखीचे ..!!!

    ReplyDelete