Monday, April 18, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;;;;; सूर्यास ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

अग्निगोल हा जळी बुडाला विझेल बघ निमिषात ,
सागरातुनी सूर्य चालला रात्रीच्या उदरात .


........... सांगा कोणी या योग्याला आग तुझ्या अंतरी ,
........... चंद्रकोर बघुनी भिजलेली वितळी लोण्यापरी .


घुटमळूनी हा असा केशरा वाट पाहशील किती ,
आज चंद्रमा नभात नाही अमावसेची तिथी .


........... समदुखी रे आपण , उरले आठवणींचे भास ,
........... मला प्रिया अन तुला चंद्रमा दर्शन नाही आज.



;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आता तुझ्या
    फक्त आठवणीच उरल्या..
    अश्रूंना आज
    सीमा न उरल्या..
    -वैशाली ओटवणेकर

    हीच प्रार्थना करते
    आज मनोमन..
    कधी तरी व्हावे
    तुझे दर्शन..
    -वैशाली ओटवणेकर

    खूप मस्त..

    ReplyDelete
  3. उपमा फार सुंदर आहेत (रात्रीच्या उदरात, लोण्यापरी, केशरा )

    ReplyDelete