Monday, June 18, 2012

;;;;;;;;;;;;; उधारी ;;;;;;;;;;;;;;
बैलास ना शिकविता परतून शिंग मारी ,
त्याने जणू शिकविली तुज बुडविण्या उधारी .

तव बोल ते फुकाचे देतो उद्याची देतो ,
तव न उद्या उजाडे, कळली तुझी हुशारी .

ना ऐकले जनांचे विश्वास टाकला मी ,
केलेस तोंड काळे, ना परतला माघारी .

मज पाहताच आता दुरुनी पळून जाशी,
पण रेकीशी कशाला ? ' भेटूच सोमवारी ' ...!

तुज शोधणे हि आता पुरते अशक्य झाले ,
वाटे तुलाही द्यावी पदवी आता ' फरारी' .


;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;5 comments:

 1. तुझ शोधणे हि आता पुरते अशक्य झाले..
  वाटे तुलाही द्यावी पदवी आता फरारी..
  क्या बात है.. :)

  ReplyDelete
 2. इति वदती मिस्टर अतुल राणे
  रागावूनी केली कविता करारी!
  (ती ही सोम-मंगळ वारी)

  ReplyDelete