Thursday, February 3, 2011

;;;;;;;;;;;;;;; कुठून कविता देऊ ? ;;;;;;;;;;;;;;;;

सौंदर्याचा माज म्हणू कि म्हणू हिची शिरजोरी ,
आता कविता भाळत नाही मम चातुर्यावारी .


गंज चढे या बुद्धीला कि हृदय निकामे झाले ,
कसे चार शब्दांना माझे पान पोरके झाले ?


पाठ फिरविली शब्दांनी तरी मन त्यामागून फिरते ,
कुशीत माझ्या वही कवितेची अश्रू ढाळीत शिरते...!


प्रसन्न होईल कशी देवता कसे तिला समजावू ,
कोरी पाने रुसतील, त्यांना कुठून कविता देऊ ..?


;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

5 comments:

  1. The Great Atul!

    tuzya kavitevar comment lihaychi mhatal ki shabdana pan vichar padato :)

    ReplyDelete
  2. येतीलच कशा त्या..
    कारण त्यानाही वाचला येऊ लागले आहे...
    ते कोरे शब्द.. ती कोरी भावना.. अन ते कोर पान..

    ReplyDelete
  3. वा अतुल ,
    पान पोरके झाले

    ReplyDelete