Sunday, February 27, 2011

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; प्रश्न ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

तुझा तेवढा एकच प्रश्न आठवतोय आता ,
'कुठला एवढा विचार करतोस असा येता जाता ? '
.
'माझ्यासोबत असतानाही तुझ्यातच असतोस , 
मी काही बोलले कि तेवढ्यापुरता हसतोस ,
अचानकच थांबतोस छान गाता गाता ,
कुठला एवढा विचार करतोस असा येता जाता ? '
.
तुझा असला प्रश्न सारया आभाळभर दाटलेला   ,
उत्तराचा भार माझ्या काळजावर साचलेला .
.
खरं सांगू , हे कोड मलाच सुटत  नाही
मनात गणित चालूच राहतं  उत्तर मिळत नाही
काळ अलगद निघून जातो तुझ्यासोबत माझा  
मनात मात्र वाढत जातो शब्दांचा बोझा
मागे ठेवून प्रश्न सारे उठून निघून जातेस
बघता बघता सहजपणे गर्दीत विरून जातेस .

लक्षात येतं बोललो  नाही काहीच जाता जाता
तुझा तेवढा एकच प्रश्न आठवतोय आता  .....!

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; 

1 comment:

  1. Mast....... "aata athavtahet te fakt kalebhor dole" chi aathavn aali.....

    ReplyDelete