Monday, May 28, 2012

;;;;;;;; माझ्यातला वेडा पुन्हा... ;;;;;;;;माझ्यातला वेडा पुन्हा परतून केव्हा यायचा ,
अन तिच्यातील गोडवा कवितेत केव्हा यायचा...!

मी तिच्यासाठीच आहे लाविली फुलबाग हि ,
पण तिला फुलवायला पाऊस केव्हा यायचा...!

पेटलो आता असा ना पेटलो इतुका कधी ,
विझविण्या आतुर तो 'मल्हार' केव्हा यायचा...!

हट्ट मी पुरवायला शब्दांस आणून बांधले ,
पण तयांना काळजातील अर्थ केव्हा यायचा ..!

माझ्याच गर्वाच्या नभातील तळपणारा सूर्य मी,
पण तयाला झाकणारा चंद्र केव्हा यायचा ....!

         ;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;

6 comments:

 1. लय भारी....
  शेवटल्या लायनीवर विचार कर... मला वाटत अजून चांगली रुपकं सापडतील!

  ReplyDelete
 2. सुंदर आहे रे,, छान !!!!!!!!!!

  ReplyDelete
 3. शेवटून दुसरं लई भारी.... मस्त...

  ReplyDelete
 4. खुप सुंदर आहे .एकच प्रश्न ....सगळ्या kadavyanchi लिंक एकमेकांशी लागत नाही.
  तसेच करायचे होते का?..पण तुम्ही कवी झालात हे नक्की ...अभिनन्दन ..!!

  ReplyDelete
  Replies
  1. एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

   गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

   नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

   अधिक माहितीसाठी ...http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi

   Delete